Vachan (वचन) plural

  



 Vachan (वचन) plural 

१) इंग्रजीमधे अनेकवचन करताना साधारणपणे एकवचनी नामाला s लावतात.

उदा. pen-pens, book-books,table-tables, chair-chairs.

२) एकवचनी नामाच्या शेवटी -s / -sh / -ch / -x असल्यास अनेकवचन करताना -es लावतात.

उदा. box-boxes, watch-watches, bus-buses, brush-brushes.

३)’0′ शेवटी असलेल्या बऱ्याच नामांचे अनेकवचन सुद्धा -es लावून करतात.

उदा. tomato-tomatoes, mango-mangoes, potato-potatoes.

४) एकवचनी नामाच्या शेवटी -y असल्यास त्याचे अनेकवचन करताना -y चे -ies केले जाते.

उदा. baby-babies, city-cities, story-stories.

परंतु शेवटच्या -y पूर्वी स्वर (a,e,i,o,u) असल्यास अनेकवचन करताना फक्त 5 लावावे.

जसे, boy-boys, day-days, donkey-donkeys, guy-guys.

५) एकवचनी नामाच्या शेवटी -f किंवा fe असल्यास त्याचे अनेकवचन करताना f/fe काढून -ves लावतात.

जसे, thief-thieves, leaf-leaves, wolf-wolves, life-lives, knife-knives

काही अपवाद:- chief, roof, proof, safe, gulf, belief यांचे अनेकवचन करताना फक्त -s लावावे.

६) संयुक्त नामांचे अनेकवचन करताना त्यातील प्रमुख भागाचे अनेकवचन करतात.

उदा. son-in-law+ sons-in-law, step-son + step-sons.

७) खालील काही शब्दांचे अनेकवचन पहा:

child- children

woman – women

foot – feet

tooth – teeth

goose – geese

८) खालील शब्दांचे एकवचन व अनेकवचन सारखे आहे:

deer – deer , sheep – sheep aircraft – aircraft, swine- swine series – series

९) dozen, hundred, thousand, million (=दशलक्ष), billion (=अब्ज),

score(= वीस, वीसचा संच) या शब्दांचे अनेकवचन करता येते. परंतु हे शब्द संख्येसोबत वापरल्यास यांचे अनेकवचन केले जात नाही. म्हणजे आपण hundreds of people (शेकडो लोक) म्हणू शकतो. पण ‘सहा शे लोक’ म्हणताना आपण six hundred people असे म्हणतो, six hundreds नाही.

१०) अक्षरांचे आणि संख्यांचे अनेकवचन करताना ‘s लावतात. जसे,

There are 3 b’s in the word ‘babble’. Add four Z’s and three 8’s.

११) संख्यावाचक नसलेली (म्हणजे uncountable) नामे item, piece वगैरे

सारख्या नामांसोबत वापरून संख्यावाचक (countable) नामाप्रमाणे वापरली

जाऊ शकतात.


उदा. a piece / a bit of advice = एक सल्ला.

a few bits of advice = काही सल्ले.

an interesting item of news = एक मनोरंजक बातमी.

many interesting items of news =

अनेक मनोरंजक बातम्या.

Sourse : Google