part of speech – शब्दांच्या जाती

 




 part of speech  – शब्दांच्या जाती

● Noun ( नाम )

१) Noun (नाम) :

 नाम’ हा शब्द इथे मराठीचाच आहे. पण ‘नाम’ हा शब्द हिंदीचाही आहे. आणि हा शब्द तात्पुरता हिंदीचा गृहीत धरला तर याचं मराठी नाव’ असं होईल. यावरून नामाची अशी थोडक्यात

व्याख्याही करता येईल की ‘नाम’ म्हणजे नाव – कशाचंही नाव, कोणाचंही नाव.

– आपण कुठल्याही दिशेने पाहिलं, जसं वर, खाली, समोर, मागे, उजवीकडे, डावीकडे, तर आपल्याला काही ना काही दिसतं. आणि त्या दिसलेल्या वस्तूला आपण ज्या शब्दाने बोलावतो तो शब्द म्हणजे ‘नाम’.

टेबल हा शब्द नाम आहे कारण ‘टेबल’ नाव आहे त्या वस्तूचं ज्याला आपण ‘टेबल’ म्हणतो. असंच ‘माणूस’ हा शब्द ‘नाम’ आहे कारण एखाद्या माणसाकडे बोट दाखवून आपण असं म्हणू शकतो, हा ‘माणूस’ आहे. आता या माणसाला पुन्हा ‘नाव’ असतं (जसं,रमेश, नरेश,गणेश, महेश) – हे नाव सुद्धा नामच आहे. याला व्याकरणात पुढे विशेष नाम म्हणतात.

– याचप्रमाणे खुर्ची, मुलगा, नदी, गाव, आकाश, सूर्य, कुत्रा, मांजर हे शब्दही नाम आहेत. पण फक्त डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीच नाम असतात असं नाही तर ज्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो – ज्यांची कल्पना करू शकतो अशा भौतिक नसलेल्या गोष्टींची नावंही ‘नामच’ असतात.

● उदाहरणार्थ: दु:ख, आनंद, भीती, राग, बालपण, तारुण्य, चांगुलपणा, दुष्टपणा हेही नाम आहेत. अशा नामांना व्याकरणात ‘भाववाचक नाम’ म्हणतात.

● नामांची उदाहरणे खाली चार गटात दिली आहेत. पहा:

१) Common noun (सामान्य नाम)

book, pen, boy, girl, man, king, house इत्यादी.

२) Proper noun (विशेष नाम)

Anil, Sunil, India, America, Nagpur, Mumbai, इत्यादी.

३) Collective noun (समूहवाचक नाम)

party, team, crowd, committee, nation, army, flock इत्यादी.

४) Abstract noun (भाववाचक नाम)

theft (चोरी), laughter (हास्य), darkness (अंधार), kindness (दयाळूपणा),

poverty (दारिद्र्य), death (मृत्यू), life (जीवन), youth (तारुण्य), motherhood (मातृत्व), strength (शक्ती), ignorance (अज्ञान), freedom

(स्वातंत्र्य), thought (विचार), beauty (सौंदर्य), इत्यादी.

***************************

● Pronoun (सर्वनाम)

२) Pronoun (सर्वनाम) : 

सर्वनामाची व्याख्या लक्षात घेण्यापूर्वी ‘हरी’ या शब्दाची जात कोणती आहे ते पहा. हरी हा शब्द नाम आहे. आता हरी या शब्दाची जात नाम आहे हे लक्षात ठेवून पुढील वाक्य वाचा:हरी काल मुंबईला गेला. हरी आज येणार होता. पण हरी आला नाही. मात्र हरीचा फोन आला. हरीने फोनवर सांगितलं की हरीचं काम झालं नाही म्हणून हरी येऊ शकला नाही. हरी म्हणत होता आणखी एक दोन दिवसात हरीचं काम होईल मग हरी येईल….

असं आपण बोलत असताना समोरचा माणूस मधेच निघून जातो. शिवाय असं बोलायला आपल्यालाही काही कमी त्रास होत नाही. म्हणून आपण सहसा असं बोलत नाही.

– आपण म्हणतो: हरी काल मुंबईला गेला. तो आज येणार होता पण तो आला नाही. मात्र त्याचा फोन आला. त्याने फोनवर सांगितले …वगैरे.

– हरी, हरी पुन्हा पुन्हा म्हणण्याऐवजी तो, त्याने, त्याला हे जे शब्द आपण वापरतो ते शब्द व्याकरणात सर्वनाम होतात. याचा अर्थ सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. उदा. he, she, it, l, we, you, they इत्यादी.

#################

● Adjective (विशेषण)

३)Adjective (विशेषण) : 

जेव्हा आपण म्हणतो ‘हरी हुशार आहे’ तेव्हा आपण हरी कसा आहे ते सांगतो – म्हणजे नामाबद्दल माहिती सांगतो. याचप्रमाणे ‘तो हुशार आहे’ असं आपण म्हटलं तर इथे

आपण ‘तो’ या सर्वनामाबद्दल माहिती सांगत आहोत.

या दोन्ही वाक्यातील हुशार हा शब्द विशेषण आहे. यावरून असं लक्षात येतं की नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण’.

उदा. good, bad, clean, dirty, big, small, wise, lazy, brave, tall इ.

@@@@@@@@@@@@@

● Verb (क्रियापद)

४) Verb (क्रियापद) : 

एकूण आठ जातीपैकी क्रियापद’ ही तुमच्या सर्वात जास्त ओळखीची जात आहे. क्रियापद हा शब्द पुस्तकात असंख्य वेळा आलेला आहे. वाक्यात कोणता शब्द क्रियापद आहे

ते दाखवणं तुमच्यासाठी कठीण नाही. जाणे, येणे, खाणे, पिणे, बोलणे, धावणे, लिहिणे, वाचणे हे शब्द क्रियापद आहेत. या शब्दांमधून क्रिया व्यक्त होते. अशा क्रिया दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियापद’ म्हणतात.

उदा. come, go, sit, stand, learn, teach, open, close, buy, sell इ.

$$$$$$$$$$$$$$$$$

● Adverb (क्रियाविशेषण)

५) Adverb (क्रियाविशेषण): 

क्रियाविशेषणाची अर्धी व्याख्या क्रियाविशेषण’ या शब्दावरूनच स्पष्ट आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण . आपण जर म्हटलं ‘तो वाचत आहे’ तर या वाक्यात वाचण्याची क्रिया कशी होत आहे ते आपण सांगितलं नाही.पण जर आपण म्हंटल तो मोठ्याने वाचत आहे किंवा वेगाने वाचत आहे किंवा हळू वाचत आहे तर इथे आपण वाचण्याची क्रिया कशी होत आहे तेही सांगितलं. आणि क्रियेबद्दल माहिती सांगणारे हे शब्द (वेगाने ,मोठयाने वगैरे) क्रियाविशेषण आहेत.

– प्रामुख्याने क्रियाविशेषण क्रियेबद्दलच माहिती सांगणारा शब्द असतो. पण व्याकरणात विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या एखाद्या क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दालाही क्रियाविशेषण म्हणतात.

खालील वाक्यांमधे क्रियाविशेषणाला ठळक केलेले आहे.

– पहा :This is a very good book. (या वाक्यात very हा शब्द क्रियाविशेषण आहे.

आणि good या विशेषणाबद्दल माहिती सांगत आहे.)

He is reading quite clearly. (या वाक्यात quite आणि clearly दोन्ही शब्द क्रियाविशेषण आहेत. quite हे क्रियाविशेषण clearly या दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल माहिती सांगत आहे.)

>>>>>>>>>>>>>>>>>>>

● Preposition (शब्दयोगी अव्यय)

६) Preposition (शब्दयोगी अव्यय) : 

आपल्याला कोणी म्हटलं ‘टेबल पुस्तक आहे’, तर आपल्याला मराठी येत असून सुद्धा या वाक्याचा अर्थ कळणार नाही. कारण टेबल आणि पुस्तक यांच्यामधे काय संबंध आहे ते या वाक्यात सांगितलेलं नाही.

पण म्हणणाऱ्याने जर म्हटलं ‘टेबलावर पुस्तक आहे’ किंवा ‘पुस्तकाखाली टेबल आहे’ तर वाक्य अर्थपूर्ण होईल. कारण या वाक्यांमधे टेबल आणि पुस्तक यांच्यामधे काय संबंध आहे ते स्पष्ट होतं.

– शब्दयोगी अव्यय म्हणजे थोडक्यात संबंध दर्शवणारा शब्द. वर, खाली, मधे, मागे,

आहे ते स्पष्ट होतं. पुढे, बाजूला ही शब्दयोगी अव्यये आहेत. हे शब्द नामाचे किंवा सर्वनामाचे वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शवतात.

इंग्रजीतील भरपूर शब्दयोगी अव्यये तुमच्या ओळखीचीच आहेत.

काही लोकांनी शब्दयोगी अव्ययांचे एक-एक अर्थ पाठ केलेले असतात. जसे, on म्हणजे वर, in म्हणजे मधे, for म्हणजे साठी, from म्हणजे पासून, of म्हणजे चा…. इतकं पुरेसं नाही. इंग्रजी भाषेतील सर्वच प्रचलित शब्दयोगी अव्ययांचा सविस्तर अभ्यास करण्याची गरज आहे.

************************

७) Conjunction (उभयान्वयी अव्यय)

उभयान्वयी अव्ययाची व्याख्या खूप सोपी आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे कसा शब्द ते दोनच शब्दात सांगता येईल. उभयान्वयी अव्यय म्हणजे जोडणारा शब्द.आणि हा मराठीतील सर्वात सामान्य जोडणारा शब्द आहे. अशा शब्दाला, जो वाक्यांना

वा शब्दांना जोडतो उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदा. and. but, because, S0, or,

That, इत्यादी.

###############

● Interjection (केवलप्रयोगी अव्यय)

८) Interjection (केवलप्रयोगी अव्यय)

पुढील शब्द पहा :- अरे! अरेरे! अरे वाह! शाब्बास! अबब!

ही केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. हे शब्द आपण अचानक वापरतो. या शब्दांच्या बाबतीत असं कधी होत नाही की आपण आज ठरवलं – ‘उद्या दुपारी बरोबर १२ वाजता अरे वाह म्हणायचं आणि वेळेवर तसं म्हटलं असं शक्य नाही.

तर केवलप्रयोगी अव्यय म्हणजे कसे शब्द ते तुमच्या लक्षात आलं. 

इंग्रजीतील काही उदाहरणे पहा :- Alas! Ah! Hurray! Ouch! इत्यादी.