नदीची आत्मकथा निबंध
मी एक नदी आहे. नदी हा शब्द तुम्हाला तर परिचितच असेल. पण तरीही मी आज तुम्हाला माझा परिचय देणार आहे मी कोण आहे? कुठून आले आहे? माझे अस्तित्व काय आहे? भारतासह मला जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे सरिता, जीवनदायिनी, रिव्हर इत्यादी. स्वभावतः मी खूप चंचल आहे परंतु कधीकधी शांत देखील होऊन जाते. खळखळ करत मी वाहत राहते. सतत- न थांबता, न अडकता मी वाहते. माझा जन्म पर्वतांमध्ये झाला होता, तेथून झऱ्यांच्या मदतीने मी जंगल आणि गावांमधून वाहत वाहत पुढे समुद्राला जाऊन मिळते.
माझ्या प्रवाह कधी कमी तर कधी जास्त होतो. माझा आकार स्थानानुसार कधी लहान तर कधी मोठा होत असतो. माझ्या मार्गात खूप अडचणी येतात, कधी दगड गोटे तर कधी मोठ मोठे पर्वत पण मी कधीही थांबत नाही. माझा मार्ग मी स्वतः तयार करून वाहत राहते. मनुष्य अनेक प्रकारांनी माझ्याशी जुळलेला आहे. तुम्ही असेही म्हणू शकतात की मी मनुष्यासाठी खूप उपयुक्त आहे. मनुष्याला अनेक पद्धतीने जीवन जगण्यासाठी मी मदत करते. माझ्या पाण्यात अनेक जलचर जीवजंतू राहतात मनुष्य त्यांना पकडून खातो. अश्या पद्धतीने मी मनुष्याची अन्नाची भूक भागवते. माझ्यामुळे भूतलावावरील सर्व घरांमध्ये पाण्याची व्यवस्था होते. मनुष्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पाणी हे अतिशय उपयुक्त आहे.
मी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत करते. माझ्या पाण्याच्या मदतीने मनुष्य वीज तयार करतो आणि याच विजेच्या मदतीने अनेक उपकरणे कार्य करतात. शेतकरी माझे पाणी शेतात पिकांसाठी वापरतो, ज्यामुळे शेतातील पिके लहरायला लागतात. जंगलातून वाहताना मी जंगली पशु पक्ष्यांची तहान भागवते व यासोबतच जंगलातील झाडांना पाणी पुरवठा करते.
माझ्या बद्दल सांगायचे झाले तर मलाही भावना आहेत, मला देखील आनंद व दुःख होते आणि मनुष्य मला अतिशय लोभी जाणवतो. आपले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो. मनुष्या द्वारे मला देवीच्या रूपात पूजले जाते, लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला प्रार्थना करतात, उपवास ठेवतात, फुले चढवतात. आणि मग दुसरी कडे तेच माझ्या पाण्यात कचरा व घाण टाकतात, मला प्रदूषित करतात. आता तुम्हीच सांगा की कोणी देवीला प्रदूषित करत का? माझी इच्छा फक्त एवढीच आहे की जर मनुष्य मला देवी मानत असेल तर त्याने मला प्रदूषित करायला नको.
आजच्या परिस्थितीत नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाले आहे. मोठमोठ्या कारखान्यातून निघणारा विषारी पदार्थांचा कचरा, घरातून निघणारा केर, प्लास्टिक, मृत लोकांची राख, विविध सण व कार्यक्रमांचा कचरा इत्यादी अनेक वस्तू माझ्या पाण्यात मिसळून मला प्रदूषित करीत आहे. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की मला प्रदूषित करणे म्हणजे मनुष्याचाच नाश करणे होय. कारण जर मी अति प्रमाणात प्रदूषित झाले तर मनुष्याला प्यायला स्वच्छ पाणी मिळणार नाही व अशुद्ध पाणी पिल्याने अनेक रोग वाढायला लागतील. म्हणून सर्वांनी आजच आपले कर्तव्य लक्षात घेऊन नदी व संपूर्ण पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या निर्णय घ्यायला हवा.
स्त्रोत : इंटरनेट
Social Plugin