सायकलची आत्मकथा निबंध

 सायकलची आत्मकथा निबंध 

मी एक सायकल बोलत आहे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कधी न कधी माझी स्वारी केलीच आहे. तुम्ही देखील माझा उपयोग करीतच असणार. मला जगभरात ओळखले जाते. गाव असो वा शहर प्रत्येक ठिकाणी माझा उपयोग केला जातो. आधीच्या काळात माझा उपयोग खूप केला जायचा. परंतु जेव्हापासून मोटारीचा शोध लागला तेव्हापासूनच माझा उपयोग कमी झाला. लोक जास्तकरून मोटारसायकल वापरतात. मोटरसायकल ने कमी वेळात जास्त अंतर गाठता येते. व मोटरसायकल चालवणार्याला जास्त कष्टही करावे लागत नाहीत.


मला चालवण्याचे अनेक फायदे आहेत. मला चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल, सिएनजी इत्यादी कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही. ज्यामुळे तुमचे पैसे तर वाचतातच याशिवाय आपल्या पर्यावरणाचेही रक्षण होते. एवढेच नव्हे तर मला चालवणाऱ्याची चांगली कसरत देखील होते. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते. माझी किंमत इतर वाहनांच्या तुलनेत कमी आहे. आजकाल डॉक्टर वजन वाढलेल्या लोकांना सायकल चालवण्याचा सल्ला देतात. 


मध्यंतरी माझा उपयोग कमी झाला होता. परंतु आज लठ्ठपणा व शारीरिक समस्यांना दूर करण्यासाठी अनेक लोक माझा वापर करतात. शालेय मुले शाळेत जाण्यासाठी माझाच वापर करतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच आधीपेक्षा माझ्या मध्ये अनेक बदल झाले आहेत. पूर्वी मला चालवण्यासाठी खूप शक्ती लावी लागायची. माझे वजन खूप जास्त होते व मी आवाज पण करायचे. परंतु आजच्या काळात मला हलके बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माझे नवनवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले जात आहेत. गियर असलेली सायकल खूप कमी शक्तीने चालते. या शिवाय बॅटरी असलेल्या सायकली मोटार सायकल प्रमाणेच बटणावर चालतात. 


माझे रूप दिवसेंदिवस बदलत आहे. जरी आज माझे महत्त्व आधी पेक्षा कमी झालेले असले तरी मी नेहमी मानव जातीची सेवा करीत राहील. लहान मुलांना अजुनही मला चालवायला आवडते. व तुमच्या आरोग्याची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे.

स्त्रोत : इंटरनेट