संगणक शाप की वरदान निबंध
मित्रांनो आज संगणक अर्थात कम्प्युटर सर्वानाच परिचयाचे आहे. संगणकाच्या शोधाणे समाजावर आणि मानवी प्रगतीवर दूरगामी परिणाम केले आहेत. आज अनेक कठीण कार्य संगणकाच्या मदतीने काही क्षणात करणे शक्य झाले आहे.
परंतु संगणकाचे जसे फायदे आहेत तसेच याचे काही नुकसान देखील आहेत. म्हणून आजच्या या लेखात आम्ही आपली साठी संगणक शाप की वरदान या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहोत तर चला निबंधाला सुरूवात करूया..
संगणकाचा शोध या युगाचा सर्वात मोठा शोध आहे. संगणकाला कॉम्प्युटर देखील म्हटले जाते. संगणकाच्या शोधामुळे मानवी कार्यक्षमतेत वृध्दी झाली आहे. आधीच्या काळात जे कार्य तासनतास खूप साऱ्या लोकांद्वारे केले जायचे ते संगणकाच्या सहाय्याने खूप कमी वेळात होऊन जाते. कॉम्प्युटर च्या या कार्य क्षमतेमुळे आज त्याला मनुष्याचा सर्वात जास्त कामात येणारा मित्र म्हटले जाते. कॉम्प्युटर मध्ये इंटरनेट च्या सहाय्याने आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. इंटरनेट हे एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे. याच्या सहायाने आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी जुळू शकतो.
संगणकाद्वारे जगभरात सूचना, माहिती, फाईल्स इ. पाठवणे शक्य झाले आहे. संगणकाने आपल्या जगाला अतिशय जवळ आणले आहे. संगणक मनोरंजन, सोशल नेटवर्किंग, सेवा प्राप्त करणे, माहिती मिळवणे इ. कामासाठी वापरले जाते. आज संगणकामुळेच घरी बसल्या काम करणे शक्य झाले आहे.
भारतात संगणक आणि इंटरनेट देशासाठी वरदान सिद्ध झाले आहे. मागील काही वर्षात स्वस्थ इंटरनेट मिळाल्याने संगणकाचा वापर अधिकच वाढला आहे. संगणकाने शहर तसेच गावातील शिक्षा प्रणालीला प्रभावित केले आहे. आज आपण संगणकाच्या सहायाने व्हिडिओ तसेच ब्लॉग पोस्ट करून जगासमोर आपले विचार मांडू शकतो. आज अधिकतर लोक घरबसल्या संगणकाच्या साहाय्याने ऑनलाईन खरेदी करतात.
संगणकाचे जसे फायदे आहेत तसेच याचे काही दुष्परिणाम देखील आहेत, हे दुष्परिणाम संपूर्ण जगासाठी एक आव्हान बनले आहेत. आज काही लोक संगणकाचे गेम्स तसेच इंटरनेट च्या आहारी जात आहेत. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. अनेक इंटरनेट हॅकर्स संगणकाच्या मदतीने माहिती हॅक करून तिचा चुकीचा वापर करीत आहेत. या मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना देखील अनेक फसवणूक होत आहेत. म्हणून संगणकाचे फायदे एकीकळे त्याला वरदान सिद्ध करतात तर त्याचे नुकसान त्याला अभिशाप म्हणून जगासमोर उभे करीत आहेत.
स्त्रोत : इंटरनेट
Social Plugin