रस्त्याचे मनोगत निबंध

 रस्त्याचे  मनोगत  निबंध 

मी एक रस्ता बोलत आहे, माझी अनेक वेगवेगळी रूपे आहेत आणि मी खूप विशाल देखील आहे. तुम्ही तर मला पाहिलेच असेल व प्रतिदिन माझा उपयोग देखील करीत असाल. पूर्वीच्या काळात मी लहानसा पायी मार्ग होतो. परंतु नंतरच्या काळात जस जशी प्रगती होत गेली तसतसे माझे स्वरूपही बदलू लागले. माझ्या लांबी सोबत रुंदी देखील वाढविण्यात आले. आधी मी कच्च्या व मातीच्या स्वरूपात होतो. परंतु नंतर हळू हळू माझे पक्के निर्माण करण्यात आले. सिमेंट कॉन्क्रीट पासून बनवलेल्या रस्त्यांवर धूळ व माती अजिबात दिसत नाही.


दिवसभरात माझ्यावरून अनेक प्रकारचे मोटरसायकल, कार, बस, ट्रक इत्यादी चालतात. मी दिवसातील 24 तास कार्य करतो. माझ्यामुळेच मनुष्य एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी पोहचतो. माझ्यावर मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी देखील चालतात. माझ्या वरून चालणाऱ्या गाड्या, माणसे व प्राण्यांना पाहून मी दुःखी नव्हता आनंदीच होतो. मी पावला नुसार प्रत्येक व्यक्तीचे वय ओळखून घेतो. जेव्हा एखादा लहान मुलगा माझ्या वर चालतो, तेव्हा हा त्याचे लहान पाऊल मला लगेच लक्षात येतात. 


प्रत्येक व्यक्ती माझ्या वरूनच गावातून शहरात आणि शहरातून गावात प्रवेश करतो. आधीच्या काळात ग्रामीण भागात मी कच्च्या स्वरूपात होतो. परंतु आज जवळपास सर्वीकडे मी स्वच्छ व पक्क्या स्वरूपात आहे. आपल्या देशभरात अनेक ठिकाणी माझे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मला पक्या व स्वच्छ स्वरूपात पाहून लोक माझी प्रशंसा करतात. जर एखाद्या ठिकाणी माझे बांधकाम कच्चे किंवा खराब झालेले असले तर लोक माझ्याबद्दल तसेच प्रशासनाबद्दल वाईटही बोलतात. 


तुम्ही मनुष्य दररोज माझा उपयोग करतात. परंतु तुमच्या मधूनच काही लोक चालता-चालता माझ्यावर थुंकतात. हे लोक जास्तकारून तोंडात काहीतरी चावत असतात. व थोड्या थोड्या वेळात माझ्या बाजूला थुंकतात. मला हे पाहून खूप दुःख होते की, मी ज्या लोकांना सहकार्य करून त्यांच्या निर्धारित स्थानावर पोहचवतो तेच लोक माझ्यावर थुंकून मला खराब करतात. याशिवाय काही लोक प्लास्टिकच्या बाटल्या, चिप्स चे खाली पॅकेट, पॉलिथिन इत्यादी वस्तू माझ्या वर टाकून देतात. मी अशा लोकांना सांगू इच्छितो की या गोष्टी फेकण्यासाठी कचरा कुंडी आहे. मला प्रदूषित करून तुम्ही तुमचे नुकसान करून घेत आहात. कारण रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे बऱ्याचदा अपघात होण्याची शक्यता असते.


याशिवाय वाहन चालवणारे काही लोक आपल्या स्थानावर लवकर पोहोचण्यासाठी वाहतूक नियमांना दुर्लक्षित करतात. अशा प्रकारचे दृष्य पाहून मला अतिशय दुःख होते. मी त्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की, वाहतुकीचे सर्व नियम तुमच्याच सुरक्षिततेसाठी बनवले आहेत. म्हणून ह्या नियमांचे पालन करून घाई न करता वाहने चालवावीत. या नियमांची अमलबजावणी न करता कार्य करून तुम्ही आपले प्राण धोक्यात घालीत आहात.


जवळपास प्रत्येक ठिकाणी रात्रीच्या वेळी माझा उपयोग कमी होऊन जातो. विशेष करून लहान शहरे व ग्रामीण भागात मी अतिशय सामसूम होऊन जातो. रात्रीच्या या वेळी कुत्रे जोरजोरात भुंकायला लागतात. अशावेळी मी लवकर सकाळ होण्याची वाट पाहत असतो. व जेव्हा सूर्याची किरणे माझ्यावर पडतात आणि लोकांची वर्दळ सुरु होते तेव्हा मला आनंद होतो. 


शेवटी मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो. कारण मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. मी या भूतलावर मनुष्य जीवनाआधी होतो व मनुष्य जीवनानंतर ही राहील. मला अंत नाही मी अनंत आहे. धन्यवाद.

स्त्रोत : इंटरनेट