माझ्या स्वप्नातील भारत निबंध
आपला देश भारत हा विविधता असलेला देश आहे, विविधतेतील एकता आपल्या देशात पाहवायला मिळते. परंतु आजही आपल्या देशातील काही लोक जात पात व धर्माच्या नावावर भांडत आहेत. देशात भ्रष्ट्राचार, अशिक्षितता, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु मी एक वेगळ्याच भारताचे स्वप्न पाहतो. माझ्या स्वप्नातील भारत हा आजच्या भारताच्या उलट असेल. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये लोक एकजुता, प्रेम व बंधुतेने राहितील.
माझ्या स्वप्नातील भारत एक असा देश असेल जिथे समानता व स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेता येईल. हा भारत एक अशी भूमी राहील जेथे व्यक्तीला जाती, धर्म, पंथ, सामाजिक आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर भेदभाव न करता समान भावनेने पाहिले जाईल. मी भारताला एक अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छितो जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
महिला सशक्तिकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी आज मोठ्या प्रमाणात महिला घरातून बाहेर निघून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे तरी आजही महिलांविरुद्ध भेदभाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्त्री भ्रूण हत्येपासून तर स्त्रियांवर होत असलेले घरेलू अत्याचार पर्यंत अश्या अनेक गोष्टींवर कार्य करणे आवश्यक आहे.
भारतातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण होय. आज जरी भारत सरकार शिक्षणावर भर देऊन लोकांना शिक्षणाविषयी जागृत करीत आहे तरीही देशातील काही भाग असे आहेत जेथे अजुनही शिक्षण पोहोचलेले नाही. यासाठी शासनाला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील कोणताही व्यक्ती अशिक्षित राहता कामा नये याची खात्री करायला हवी.
देशातील तिसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी होय. आज देशातील मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित युवा रोजगारापासून वंचित आहेत. त्यांना योग्यता असतानाही योग्य रोजगाराची संधी मिळत नाही आहेत. यासाठी भारत शासनाने देशात उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात. माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिकाला काही न काही नोकरीची संधी उपलब्ध राहील.
आपल्या देशातील चौथी समस्या म्हणजे धर्म, जात-पात इत्यादी गोष्टी मधील भेदभाव. अनेक लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कट्टर तेचा आधार घेतात. मी स्वप्न पाहतो कि एक दिवस भारत हा जात-पात मुक्त होऊन सशक्त राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल.
भारतातील पाचवी समस्या म्हणजे भ्रष्टाचार होय. शिक्षणामुळे आज देशातील नागरिक समजदार झाले आहेत, म्हणून देशात पूर्वीपेक्षा भ्रष्टाचार कमी आहे परंतु आजही अनेक नेता, राजनेता स्वतःचे खिसे भरण्यात लागलेले आहेत. मी अश्या भारताचे स्वप्न पाहतो जेथील सर्व मंत्री पूर्णपणे देशाला समर्पित राहून, देशवासीयांच्या विकासासाठी कार्य करतील.
स्त्रोत : इंटरनेट
Social Plugin