सूर्य उगवला नाही तर ...... निबंध


सूर्य उगवला नाही तर ...... निबंध 

 आपल्या आकाशगंगेत सुर्य हा एकमेव नैसर्गिक ऊर्जा, प्रकाश आणि उष्णतेचा स्त्रोत आहे. ज्याप्रमाणे तो पृथ्वी साठी उपयुक्त आहे त्याच पद्धतीने तो आकाशगंगेतील सर्व ग्रहांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचा आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर एखाद्या दिवशी सूर्य उगवला नाही तर..?

जर सुर्य उगवला नाही तर कुठेही उजेड दिसणार नाही सर्वीकडे अंधार पसरलेला राहील, जरी सुर्य राहिला नाही तरी चांदण्या आकाशात चमकत राहतील. परंतु त्याचे उजेड आपल्यासाठी पुरेसे नसेल.

आपल्या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्ती वेळ चुकावतो. पण आपल्यामध्येच एक जण असाही आहे जो हजारो वर्षापासून न चुकता आपले कार्य नित्य नियमाने करीत आहे आणि तो आहे सुर्य. सूर्य हा पृथ्वीवरील ऊर्जा, उष्णता आणि प्रकाशाचा कधीही न संपणारा नैसर्गिक स्त्रोत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सूर्याला देव म्हटले जाते. बरेच लोक दररोज सूर्याला पाणी देऊन पूजा करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर सूर्यच उगवला नाही तर..? माझ्या मनात हा प्रश्न बऱ्याचदा आला आहे. 

पहिली आणि मजेची गोष्ट अशी की जर सूर्य उगवला नाही. तर सकाळचं होणार नाही आणि यामुळे कोणालाही लवकर उठून शाळेत जायचे टेन्शन राहणार नाही. मी तर मस्त उशिरापर्यंत झोपून राहील. नंतर दुपारी 12 वाजेच्या क्लासला जायचे देखील ताण राहणार नाही. दिवसभर काळोख पसरलेला राहील. थोडे फार तारे नक्की असतील पण ते देखील ढगांमुळे झाकले जातील. 

सुरू उगवला नाही तर लहान मुलाची मजाच मजा राहील. परंतु सृष्टी चक्र नियमित सुरू ठेवण्यासाठी सूर्य खूप उपयोगाचा आहे. कारण जर सुरू उगवला नाही तर पृथ्वीवरची उष्णता हळू हळू कमी व्हायला लागेल. व तापमान वजा अंश सेल्सिअस मध्ये पोहचून जाईल ज्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी वाढेल. झाडांना फोटोसिंथेसिस पद्धतीने म्हणजेच सूर्याच्या प्रकाशने अन्न निर्माण करावे लागते पण जर सुर्यच नसेल तर झाडांना अन्न तयार करता येणार नाही. ज्यामुळे पृथ्वीवरील झाडे हळूहळू नष्ट होत जातील. झाडे नष्ट झाली की आपल्याला खायला अन्न राहणार नाही. दरवर्षी सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते व यामुळेच पाऊस पडतो. परंतु जेव्हा सूर्य उगवणार नाही तेव्हा पाण्याचे बाष्पीभवन ही होणार नाही. ज्यामुळे पाऊस पडणार नाही. आणि पाऊस पडला नाही तर मनुष्य व प्राण्यांना प्यायला पाणी मिळणार नाही. 

उन्हाळ्यातील सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील रोगराई पसरवणारे जीव जंतू मरून जातात. ज्यावेळी सूर्य उगवला नाही तेव्हा अनेक रोग वाढतील गरीबी व उपासमारीचे दिवस येतील. जर आपल्याला वाटत असेल की सूर्य उगवला नाही तर मनसोक्त मजा करता येईल. परंतु तसे अजिबात नाही धरतीवर जर प्रकाशचं नसेल तर बाजार भरणार नाही.  ज्यामुळे वस्तूंची देवाण घेवाण होणार नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर सूर्य न उगवल्याणे आपल्याला फायदे नव्हता नुकसानच होतील. परंतु तुम्हाला घाबरण्याचे काहीही एक कारण नाही. कारण सुर्य हा काय आपल्यासारखा मनुष्य नसून तो देवाप्रमाने आहे. तो हजारो-लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे व जोपर्यंत मनुष्य जीवन असेल तोपर्यंत तो देखील राहील.
स्त्रोत : इंटरनेट