परीक्षा नसत्या तर. . . . निबंध

 परीक्षा नसत्या तर. . . . निबंध 

प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी या विचाराने आभ्यास करतो की त्याला परीक्षेत उत्तीर्ण व्ह्यायचे आहे. उत्तम तयारीसाठी बरेच विद्यार्थी शाळेसोबत इतर कोचिंग क्लासेस देखील लावतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर परीक्षाच नसत्या तर? जर परीक्षा झाल्या नसत्या तर आम्हा विद्यार्थ्यांना कशाचेही भय राहिले नसते. कारण कोणताही विद्यार्थी हाच विचार करून अभ्यास करतो की त्याला परीक्षेत उत्तीर्ण व्ह्यायाचे आहे. परीक्षेची तयारी नाही तर अभ्यास नाही. विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट लाभदायक ठरली असती. 


परंतु जर परीक्षा नसत्या तर कोणीही अभ्यास केला नसता. ज्यामुळे आपला देश मागे पडला असता. मुले अभ्यास सोडून दिवसभर खेळत राहिले असते. ज्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारात गेले असते. म्हणून परीक्षा खूप महत्त्वाची आहेत. परीक्षेच्या भयाने विद्यार्थी रात्र रात्र व सकाळी लवकर उठून अभ्यास करतात. परंतु परीक्षा नसत्या तर या पद्धतीने कोणीही अभ्यास केला नसता. तरुण मुलांमध्ये आळस वाढला असता.


कोणत्याही देशाचा विकास देशातील तरुण पिढीवर अवलंबून असतो. देशातील मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत. आणि जर या मुलांना परीक्षेचे भय राहिले नसते तर यांनी आपल्या आयुष्यात काहीही केले नसते. परीक्षेमुळेच शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांची योग्यता लक्षात येते. परीक्षेचे मार्क लक्षात घेऊनच आईवडील त्यांच्या मुलाचे पुढील शिक्षण करतात. परंतु परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्याची योग्यता लक्षात आली नसती. ज्यामुळे पुढील शिक्षण काय करावे हे विद्यार्थी व पालकांना लक्षात आले नसते. परीक्षेचे टेन्शन नसल्याने मुलांना वाईट सवयी लवकर लागल्या असत्या. म्हणूनच परीक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. 


बऱ्याचदा पाहिले जाते की विद्यार्थी परीक्षेत पास होण्यासाठी नकल व कॉपी करतात. बऱ्याच शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या या कार्याला सहयोग करतात. परंतु असे करणे खूप चुकीचे आहे. कारण जरी एका इयत्तेत विद्यार्थी कॉपी करून उत्तीर्ण झाला तरी पुढील शिक्षणात तो व्यवस्थित लक्ष देऊ शकणार नाही. परीक्षेत नकल करणारे विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतात. म्हणून परीक्षा होणे व नकल न करता परीक्षेत उत्तीर्ण होणे खूप आवश्यक आहे.

स्त्रोत : इंटरनेट