फुलांचे आत्मवृत्त निबंध

 फुलांचे आत्मवृत्त  निबंध 


मी बागेत फुलणारे एक प्रसिद्ध फुल आहे व तुम्ही सर्वजण मला ओळखतच असाल. मी फुलांचा राजा गुलाब बोलतोय. मी सध्या एका बागेत फुललेलो आहे. माझा जन्म याच उद्यानात झाला होता. 


दोन दिवसांआधी मी पण माझ्या बाजूला असलेल्या या काटेरी आणि कोमल फाद्यांवर माझ्या भावांप्रमाणे झुलत होतो. कळीच्या रूपात स्वताला पाहून मनातल्या मनात विचार करीत होतो की एक दिवस मी पण सुंदर फुल बनेल. आणि वाट पाहता पाहता तो दिवस पण आला मी एक सुंदर फुल बनलो.


माझ्या सुगंधामुळे मधमाश्या व भवरे माझ्या आजूबाजूला गोळा होऊ लागले. सकाळ सकाळी दव बिंदूनी माझी आंघोळ घातली. जोरदार हवेने माझा चेहरा पुसला आणि सूर्याच्या प्रकाशात मी खेळणे शिकलो. वसंत ऋतु मध्ये तर माझी शोभा आणखीनच वाढते. माझ्या चारही बाजूंना गुलाबाचा गुलाब दिसतात. 


या शिवाय उद्यानात असलेले माझे अन्य फुल मित्र चंपा, चमेली, जुही, सूर्यफूल, रातराणी इत्यादी फुले उद्यानाची शोभा आणखीनच वाढवतात. आम्ही सर्वजण उद्यानात येणारे लहान मुले, मोठे व वृद्ध लोकांचे लक्ष खेचून घेतात. जर कोणी मला हात लावण्याची किंवा तोडण्याची चेष्टा केली तर माझे काटे माझे रक्षण करतात. 


मी फक्त मधमाशांना माझा रस देत नाही तर पर्यावरणालाही प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. माझ्या सुगंधाने वातावरणाला सुगंधित व मोहक करून देतो. आजकाल काही लोक मला विनाकारण तोडून घेतात. काही लोक मला तोडून मशीनी मध्ये टाकून देतात. तेथे माझ्या पाकळ्या पासून सुगंधित परफ्यूम व गुलाबजल तयार केले जाते. या सर्व गोष्टींचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात केला जातो.


या शिवाय माझ्या पाकळ्या पासून गुलकंद, शरबत, तेल व आयुर्वेदिक औषधे देखील बनवली जातात. जगभरात 22 सप्टेंबरला तर भारतात 7 फेब्रुवारीला माझ्या सन्मानार्थ 'गुलाब दिवस साजरा' केला जातो.  आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या जॅकेटमध्ये नेहमी गुलाबाचे फुल लावत असत. पंडित नेहरूंना लहान मुले आवडत असत. याशिवाय सत्कार समारंभात गुलाबाचेच पुष्प देऊन स्वागत केले जाते. 


मानव जातीसाठी माझे भरपूर उपयोग आहेत. परंतु काही लोक कारण नसताना निर्दयपणे मला तोडून टाकतात. मला तोडल्यावर मी हळू हळू सुकू लागतो. म्हणून जर तुम्ही दुरूनच माझ्या सुंदरतेचा आस्वाद घ्याल तर मला खूप आनंद होईल.

स्त्रोत : इंटरनेट