माझा आवडता छंद चित्रकला निबंध

  माझा आवडता छंद चित्रकला निबंध 


प्राचीन काळापासूनच भारतीयांची चित्रकलेत रुची आहे. आधीच्या काळातील लोकांनी जुन्या गुहा, झाडे झुडपे, जंगल व खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र काढून आपल्या समोर ठेवले आहेत. काही चित्रकार आपल्या कलेच्या माध्यमातून शिकार करणारे पशू पक्षी बनवत असत. चित्रकला खूप छान कला आहे. चित्रकार या कलेच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवितो. जेव्हा मानव जंगलात जाऊन शिकार करतो तेव्हा कश्या प्रकारे त्या प्राण्याला त्रास होतो हे सर्व चित्रकार दाखवतो. असे केल्याने शिकार करणार्या शिकारी चे डोळे उघडतात व तो परत असे कृत्य करीत नाही.


आधीच्या काळात राजे लोक चित्रकारांना बोलवून राजदरबाराच्या भिंतींवर चित्र बनवत असत. त्या चित्रांमध्ये स्त्रिया नृत्य करताना दाखवल्या जायच्या, काही भिंतींवर प्रेम प्रसंगाची चित्रे सुद्धा काढली जायची. राजा चित्रकला करणार्या चित्रकार वर खुश होऊन त्याला बक्षिसे सुद्धा द्यायचा. प्राचीन काळापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत चित्रकारांना सन्मानित केले जात आहे. त्यांच्या चित्रकलेची प्रशंसा केली जात आहे. आज आपल्या देशात सोबतच विदेशात देखील चित्रकारांना सन्मानित केजा जात आहे. जेव्हा चित्रकार कोणतेही चित्र बनवतो तेव्हा त्याला पूर्ण जिवंत करून टाकतो आणि आपण त्या चित्राला पाहताच लक्षात येते की या चित्रात कोणती तरी गोष्ट लपलेली आहे. 


बरेचसे चित्रकार पळणर्या घोड्यांचे चित्र बनवता तर काही चित्रकार गरिबी दाखवण्यासाठी भिकर्याचे चित्र बनावतात. काही चित्रकार आपल्या कलेने प्रदूषण सारख्या गंभीर समस्या सुद्धा लोकंसमोर मांडतात. त्या चित्रात एका व्यक्तीला वृक्ष तोडतांना दाखवले जाते तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती श्र्वसाच्या आजाराने त्रस्त असतो. जेव्हा आपण त्या चित्राला पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण वृक्ष तोड रोखायला हवी. चित्रकला पूर्ण जगाला जागृत करते, अन्य सर्व कलांमध्ये चित्रकला ही श्रेष्ठ मानली जाते. मोठमोठ्या लेखकांनी चित्रकलेला श्रेष्ठ म्हटले आहे.


जेव्हा चित्रकार चित्र बनवतो तेव्हा त्यात वेगवेगळे रंग वापरले जातात. चित्र व्यक्तीच्या वास्तविकतेला सांगते. एकदा मी एका चित्रकाराच्या चित्राला पाहण्यासाठी गेलो मला त्याचे चित्र खूप आवडले त्या चित्रात एक व्यक्ती पोपटाला पिंजऱ्यात कैद करून ठेवतो, त्याला खाया प्यायला पडलेले असते पण तो काहीही खात नाही. दुसऱ्या चित्रात एक दूसरा व्यक्ति येतो व तो पोपटाला दु:खी पाहून पिंजरा उघडून देतो. जेव्हा मी ती चित्र पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आले की पक्ष्यांना कैद करून ठेवायला नको. त्यांना मोकळ्या हवेत आपले जीवन जगण्याचा अधिकार असतो.


मी माझ्या वहीत माझ्या आई वडिलांचे एक चित्र काढले आहे. ते चित्र माझे आवडते चित्र आहे. या शिवाय मला फळे जसे आंबा, संत्री आणि केळी चे चित्र काढायला आवडतात. माझी आई मला जास्तीत जास्त चित्र काढायला प्रोत्साहन देते. माझ्या शाळेत देखील प्रत्येकाला माझे चित्र आवडते. जेव्हा केव्हा शाळेत चित्रकला स्पर्धा असते. तेव्हा मला त्यात सहभाग घ्यायला सांगितले जाते. मी पण मोठ्या आनंदाने चित्रकला स्पर्धेत भाग घेतो. माझ्या वडिलांनी मला घरात एक लहान खोली चित्रकला करण्यासाठी करून दिली आहे. त्या खोलीत मी माझे सर्व चित्र ठेवले आहेत. 


चित्रकले साठी लागणारे सर्व साहित्य माझे आई वडील मला आणून देतात. त्यांनी मला चित्र काढण्यासाठी कधीही नाही म्हटले नाही उलट ते माझे चित्र पाहून आनंदित होतात. भविष्यात मी एक चित्रकार बनेल व छान छान संदेश लपलेली चित्रे काढत जाईल.