माझा आवडता छंद क्रिकेट निबंध

 माझा आवडता छंद क्रिकेट निबंध

मला खेळायला खूप आवडते. खेळल्यामुळे माझे शरीर तंदुरुस्त राहते. तसे पाहता आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात जसे हॉकी, टेबल टेनिस, क्रिकेट, हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी. पण या सर्वांमध्ये मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो. एक प्रकारे क्रिकेट हा माझा छंदच आहे. छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आनंद वाटतो. छंद है आभ्यासाव्यातिरिक्त शरीर व मनाला आनंद देण्यासाठी जोपासले जातात. काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चातही केले जातात. क्रिकेट हा कमी खर्चात केला जाणार सर्वात चांगला छंद आहे. 


आज भारतात क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मी रोज संध्याकाळी माझ्या मित्रासोबत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर जातो. क्रिकेट मध्ये एक सोबत 22 लोक खेळू शकतात. यात दोन संघ पाडले जातात. दोघींमध्ये 11-11 खेळाडू असतात. क्रिकेटमध्ये दोन अंपायर पण असतात अंपायर निर्णय देण्याचे काम करतात. अंपायरचा निर्णय सर्वांना मानावा लागतो. क्रिकेट स्वच्छ मैदानात खेळला जातो. क्रिकेट आज भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्टइंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड इत्यादी देशात खूप लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब-श्रीमंत, नेता-अभिनेता, विद्यार्थी-कर्मचारी सर्वांनाच पहायला व खेळायला आवडतो.


क्रिकेटला खेळण्यासाठी बॅटबॉल ची आवश्यकता असते. याशिवाय शरीरात तंदुरुस्ती आणि स्फूर्ती ची पण आवश्‍यकता असते. क्रिकेट खेळल्याने शारीरिक स्वस्थ चांगले राहते. रोग प्रतिरोधक क्षमता पण वाढते.  क्रिकेट खेळण्याचे मानसिक फायदे सुद्धा होतात. क्रिकेट खेळल्यामुळे माझे अभ्यासात चांगले चित्त लागते. क्रिकेटमुळे एकाग्रता वाढते व वाचलेले लक्षात ठेवायला मदत मिळते. क्रिकेट हा माझा आवडता छंद आहे मी कायम क्रिकेट खेळत राहील. तुम्हा सर्वांना पण माझा सल्ला आहे की तुम्हीही क्रिकेट खेळण्याचा छंद जोपासा.